“भगवान जगन्नाथांना मोदींचे भक्त” म्हणणाऱ्या संबित पात्रांना पश्चाताप ; माफी मागत म्हणाले,”मी 3 दिवस…”

Sambit Patra Apologize । ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त म्हटले. त्यावरून नवीन वाद निर्माण झालाय. दरम्यान, हा वाद निर्माण झाल्यानंतर संबित पात्रा यांनी माफी मागितलीय. याविषयी बोलताना त्यांनी मला पश्चात्ताप व्हावा यासाठी मी पुढील ३ दिवस उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
भाजप नेते संबित पात्रा यांनी रात्री 1 च्या सुमारास ट्विटरवर माफीचा व्हिडीओ शेअर केला त्यात त्यांनी, “महाप्रभू श्री जगन्नाथ जी यांच्याबद्दल माझ्याकडून झालेल्या चुकीमुळे आज माझे अंतर्मन अत्यंत दुखी झाले आहे. मी महाप्रभू श्री जगन्नाथजींच्या चरणी मस्तक टेकून क्षमा मागतो. पश्चात्ताप करून माझी चूक सुधारण्यासाठी मी पुढील ३ दिवस उपोषण करणार आहे.” माझी जीभ घसरली होती आणि त्यामुळेच माझ्याकडून चूक झाली,” त्यांनी सांगितले.
आज महाप्रभु श्री जगन्नाथ जी को लेकर मुझसे जो भूल हुई है, उस विषय को लेकर मेरा अंतर्मन अत्यंत पीड़ित है।
मैं महाप्रभु श्री जगन्नाथ जी के चरणों में शीश झुकाकर क्षमा याचना करता हूँ। अपने इस भूल सुधार और पश्चाताप के लिए अगले 3 दिन मैं उपवास पर रहूँगा।
जय जगन्नाथ। 🙏
ଆଜି ଶ୍ରୀ… pic.twitter.com/rKavOxMjIq
— Sambit Patra (Modi Ka Parivar) (@sambitswaraj) May 20, 2024
संबित पात्रा काय म्हणाले? Sambit Patra Apologize ।
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी संबित पात्रा यांना त्यांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त केला. त्यावर पात्र यांनी बोलताना “पुरीमध्ये पंतप्रधान मोदींच्या रोड शोच्या यशानंतर मी अनेक माध्यमांना निवेदने दिली. यावेळी मी सर्वत्र म्हटले की पीएम मोदी हे भगवान जगन्नाथाचे भक्त आहेत, पण एका ठिकाणी मी चुकून उलट विधान केले. तुम्हाला माहित आहे की कधीकधी जीभ घसरते, म्हणून त्याला चर्चेचा विषय बनवू नका.” असा सल्ला त्यांनी दिला.
काय म्हणाले नवीन पटनायक? Sambit Patra Apologize ।
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विटरवर लिहिले, “भगवान जगन्नाथ महाप्रभू श्री जगन्नाथ हे विश्वाचे प्रभु आहेत. महाप्रभूंना कोणत्याही मानवाचा भक्त म्हणणे हा ईश्वराचा अपमान आहे. यामुळे करोडो जगन्नाथ भक्त आणि ओडिया लोकांच्या श्रद्धेला धक्का बसला आहे. ते पुढे म्हणाले की, भगवान जगन्नाथ हे आपल्या अस्मितेचे सर्वात मोठे प्रतीक आहे. राज्यातील जनता हे लक्षात ठेवेल आणि आम्ही त्याचा निषेध करतो.,” असे म्हटले.





