“असंवेदनशील कारवाईने वातावरण बिघडले, भाजप जबाबदार” ; संभल हिंसाचारावरून राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

Sambhal on Rahul Gandhi। उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात असलेल्या जामा मशिदीत रविवारी सर्वेक्षणाचे काम सुरू असताना झालेल्या हिंसाचारामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संभलच्या जामा मशिदीत रविवारी न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली.’ या हिंसाचारात गोळीबार आणि दगडफेकीत चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण २० जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या वादावर राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘उत्तर प्रदेश संभलमध्ये नुकत्याच झालेल्या वादावर राज्य सरकारची पक्षपाती आणि उतावीळ वृत्ती अत्यंत दुर्दैवी आहे. हिंसाचार आणि गोळीबारात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना’ आहे.
संभल, उत्तर प्रदेश में हालिया विवाद पर राज्य सरकार का पक्षपात और जल्दबाज़ी भरा रवैया बेहद दुर्भाग्यपूर्ण है। हिंसा और फायरिंग में जिन्होंने अपनों को खोया है उनके प्रति मेरी गहरी संवेदनाएं हैं।
प्रशासन द्वारा बिना सभी पक्षों को सुने और असंवेदनशीलता से की गई कार्रवाई ने माहौल और…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 25, 2024
लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा Sambhal on Rahul Gandhi।
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिले की, “प्रशासनाने सर्व पक्षांचे ऐकून न घेता केलेल्या कारवाईमुळे आणि असंवेदनशीलतेने वातावरण बिघडले आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला. ज्यासाठी भाजप सरकार थेट जबाबदार आहे. भाजपचा सत्तेचा वापर हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणे आणि भेदभाव करणे आहे. ते राज्याच्या किंवा देशाच्या हिताचे काम करत नाहीत. मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणात लवकरात लवकर हस्तक्षेप करून न्याय द्यावा. शांतता आणि परस्पर सौहार्द राखण्याचे माझे आवाहन आहे. जातीयवाद आणि द्वेष न करता भारत एकता आणि संविधानाच्या मार्गाने पुढे जाण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे.
संभल जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी Sambhal on Rahul Gandhi।
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील हिंसाचारानंतर निर्माण झालेला तणाव लक्षात घेता संभल तहसीलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून सोमवारी १२वीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय भारतीय न्यायिक संहिता (BNS) 163 अन्वये 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.





