Sambhajiraje Chhatrapati । माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्यावर किल्ले विशाळगडवर झालेल्या हिंसाचारानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात येतंय. विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या हिंसक वळणानंतर विशाळगडच्या पायथ्याला आणि विशाळगडावर प्रचंड प्रमाणात तोडफोड, वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. संभाजीराजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल Sambhajiraje Chhatrapati । कोल्हापूर पोलिसांनी या हिंसक वळणानंतर आता कारवाई करण्यास सुरू केलीय. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांकडून पुण्याच्या रवींद्र पडवळ, कोल्हापूरचे बंडा साळोखे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आतापर्यंतच्या प्राप्त माहितीनुसार, 21 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. दरम्यान, कालपासून संभाजी राजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पोलिसांनी आज हा संभाजीराजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दोन वेगवेगळी आंदोलन Sambhajiraje Chhatrapati । पोलिसांकडून 500 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांच्य तपासामध्ये आणखी काही नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, काल विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी पुण्याच्या रवींद्र पडवळ यांच्या नेतृत्वात आणि संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात विशाळगड आणि विशाळगडच्या पायथ्याशी दोन वेगवेगळी आंदोलन झाली होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं आणि ज्यांचा गडावरील अतिक्रमणाशी काही सुद्धा संबंध नाही अशा लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आल्यानंतर प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्यात आल्याने संताप निर्माण झाला. दरम्यान, पोलीस तपासामध्ये सीसीटीव्ही आणि इतर रेकॉर्डिंग पाहून गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हेही वाचा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून महिलांना मोठी भेट ! उपमुख्यमंत्री अजितपवारांनी केली ‘ही’ विशेष घोषणा