ISIS Sambhajinagar । राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISISI दहशतवादी कट प्रकरणी 2 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. हे दोघेही औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगरशी जोडलेल्या ग्लोबल टेरर नेटवर्कच्या मॉड्यूलमध्ये सामील होते. एनआयएने मोहम्मद जोहेब खानला या वर्षी फेब्रुवारीमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर अटक केली होती. लिबियामध्ये राहणारे जोहेब आणि मोहम्मद शोएब खान यांच्यावर ISIS च्या भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे. या दोघांनी भारतातील संवेदनशील ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरुणांची भरती करण्याचा कट रचला होता. मिळलेल्या माहितीनुसार, भारतात कट रचण्यासाठी ISIS जोहेबने छत्रपती संभाजीनगरमधील 50 हून अधिक तरुणांसह एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता, असे तपासात आढळून आले आहे. मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात शुक्रवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये, दोघांना NIA RC-01/2024/NIA/MUM प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव देण्यात आले आहे. IPC आणि UA(P) कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात परदेशात राहणाऱ्या आयएसच्या हस्तकांचा सहभाग असल्याचे तपास यंत्रणेने उघड केले आहे. एनआयएने या प्रकरणाचा तपास करताना यापूर्वी दोन्ही आरोपींचा भारतविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे उघड केले होते. या दोघांनी ISIS च्या स्वयंघोषित खिलाफ तशी निष्ठा व्यक्त केल्याचे आढळून आले. दरम्यान, NIA भारतातील ISIS मॉड्यूलचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी सतत काम करत आहे. गेल्या 18 महिन्यांत दहशतवाद आणि बनावट भारतीय चलनासह 100 हून अधिक आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. दहशतवादविरोधी एजन्सीने 2023 मध्ये 27 प्रकरणांमध्ये 79 आरोपींना दोषी ठरवले होते. त्यानंतर 2024 च्या पहिल्या सहामाहीत एनआयएच्या विशेष न्यायालयांनी 6 प्रकरणांमध्ये 26 जणांना दोषी ठरवले. तसेच, 2019 ते जून 2024 पर्यंत एनआयएशी संबंधित विविध प्रकरणांमध्ये 354 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. एका निवेदनानुसार, या कालावधीत एनआयए विशेष न्यायालयांनी 103 प्रकरणांमध्ये दिलेल्या निकालांपैकी 100 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.