Samay Raina : समय रैना डिसेंबरमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीला पोस्ट टॅग करत सोडलं मौन
Samay Raina : समय रैनाने इन्स्टाग्रामवर खास पद्धतीने दिली रिअॅक्शन

Samay Raina : कॉमेडियन समय रैना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. लवकरच तो ’12th फेल’ फेम अभिनेत्री मेधा शंकर हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेधा शंकर आणि समय रैना यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यानंतर दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
यानंतर आता व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये समय रैना आणि मेधा शंकर यांचं लग्न फिक्स झाल्याचं म्हटले आहे. समय रैना डिसेंबर 2026 ला लग्न करणार असल्याचं यात म्हटलं होतं. ही पोस्ट व्हायरल होताच समय रैनाने इन्स्टाग्रामवर रिअॅक्शन दिली आहे. “समय रैना डिसेंबरमध्ये मेधा शंकरशी लग्न करणार का?” ही पोस्ट शेअर करत, समयने ‘झूठ बोले कौवा काटे’ हे गाणंही बॅकग्राउंडला लावलं आहे.
‘…सॉरी लग्न पुढे ढकलावे लागेल’
लग्नाच्या अफवांवर प्रतिक्रिया देत समयने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, ‘डिसेंबर महिन्यात तर माझं इंडिया टूर आहे. मेधा शंकर सॉरी लग्न पुढे ढकलावे लागेल’, असं म्हणत त्याने अभिनेत्रीलाही पोस्टमध्ये टॅग केलं आहे. मेधा शंकरनेही समयची ही पोस्ट रिशेअर करत काही मजेशीर इमोजी जोडले आहेत. शिवाय लग्नाच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचं म्हणत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. Samay Raina
दरम्यान, समय आणि मेधा यांच्या डेटिंगच्या चर्चा अलिकडेच सुरू झाल्या. जून २०२६ मध्ये, ते एका प्रीमियरमध्ये एकत्र दिसले होते. पापाराझींना पाहताच ते एकमेकांपासून दूर जाऊ लागल्याने चर्चांना अधिक उधाण आले. यानंतर मेधा काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्येही दिसली होती. वरुण धवन आणि शेरोन वर्मासोबत ती या शोमध्ये हजर झाली होती. Samay Raina
हेही वाचा:
Canada plane crash : कॅनडात प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं ; दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू







