Samay Raina: मुख्यमंत्री फडणविसांच्या हस्ते सत्कार अन् समय रैना पुन्हा वादात; ‘त्या’ विधानावरून टीका
Samay Raina: कश्मीरी पंडित आणि बिहारींवरील वक्तव्यावरून समय रैना पुन्हा वादात

Samay Raina: कॉमेडियन समय रैना त्याच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातील एका विनोदामुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या एपिसोडमध्ये काश्मिरी पंडित आणि बिहारी लोकांबद्दल केलेल्या कथित विनोदामुळे वाद निर्माण झाला आहे.
इंडियाज गॉट लेटंटच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या भागात समय रैनासह अर्चना पुरन सिंह आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन शेरॉन वर्मा प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
काही वर्षांपूर्वी इंडियाज गॉट लेटंटमधूनच पुढे आलेली शेरॉन ही बिहारी आहे. त्यामुळे ओळख करून देताना समय रैना म्हणाला ‘ही बिहारची आहे आणि इतकी बिहारी आहे की तिला ‘इबोला ‘ म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं असं वाटतं. शेरॉन ही अशी बिहारी आहे जी नोकरीचा शोधात मुंबईत आली होती आणि बिहारी सहसा असे करतात.”
यावर शेरॉन म्हणते, ‘समय इतका कश्मीरी आहे की त्याला स्वतःवर दगड भिरकवून घ्यायला आवडतं. किमान मी स्वतःच्या मर्जीने माझं राज्य सोडलं’ यावर उपस्थित त्यामध्ये हशा पिकलेला असतो. दरम्यान, समय रैना हा मूळचा कश्मीरी आहे. कश्मीरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा संवेदनशील असल्यामुळे त्याच्या या विनोदावर टीका होत आहे.
Bihari Vs Kashmiri 🗿
Sharon Verma brutally roasted Samay Raina 😂🔥 She absolutely cooked him! pic.twitter.com/Q9Ipi8wBqp
— ᴅᴇᴀᴅ ᴋɪʟʟᴇʀ (@ReignOfBateman) August 28, 2026
भाजप आमदार राम कदम आक्रमक
भाजप आमदार राम कदम यांनी समय रैनाच्या बिहारी- कश्मीरी विनोदावरून समय रैनाचा चांगलाच समाचार घेतलाय. ते म्हणाले ” काहीही बोलून फुकटची प्रसिद्धी मिळवणे, ही काहींची प्रवृत्ती बनली आहे. प्रसिद्ध होणे हा त्यांचा एकमेव हेतू असतो. सनातन हिंदू धर्माच्या देवी देवता आणि कश्मीरी पंडित हे उपहासाचे विषय असू शकत नाहीत. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे.”
“दहशतवादी आणि पाकिस्तान आयएसआयच्या कटामुळे त्यांना आपली घरे सोडून विस्थापित होण्यास भाग पाडले गेले. एवढ्या वेदना आणि अत्याचाराला सामोरे गेलेल्या समाजाविरुद्ध अशा अपमान जनक भाषेचा वापर सुसंस्कृत समाजात अस्वीकार्य आहे. आधी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह बोलायचे आणि नंतर माफी मागायची, मग यांना देशभरात फुकटची प्रसिद्धी मिळते,” असा टोलाही आमदार राम कदम यांनी लगावला. सध्या समय रैनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर टीका केली जात आहे.
हेही वाचा:





