दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या मायोसिटिस नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. सामंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच तिच्या आजाराचा खुलासा केला होता. त्यानंतर सामंथाने सध्या फिल्म शुटिंगमधून एक वर्षाचा ब्रेक घेतला आहे. त्यामुळे ती विश्रांतीसाठी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे. सध्या ती बालीमध्ये पोहचली आहे. येथील तिचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात समंथाच्या खास लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बालीमध्ये सामंथासोबत तिची मैत्रिण अनुषा स्वामी देखील आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये सामंथाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केला आहे. तिने अलिकडेच ट्रिम केलेले केस डोक्यावरील हॅटने झाकले आहेत. तर नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्राच्या किनारी थांबलेली दिसते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांची देखील तिच्या फोटोला पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
कामातून ब्रेक घेऊन सामंथा आपल्या तब्येतीकडे लक्ष केंद्रित करत आहे. मायोसिटिस नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त असताना देखील तिने यशोदा नावाचा चित्रपट पूर्ण केला. त्यानंतर शाकुंतमल या तेलुगु भाषेतील पौराणिक चित्रपटात काम केले. आजारपणामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तिने चित्रपटातील कामे पूर्ण केले आहेत. त्यानंतर आता तिने कामातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.