समांथाने फॅमिलीसोबतचे शेअर केले फोटो; भाऊ डेव्हिडच्या लग्नात लावली हजेरी

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नागा चैतन्यने सामंथासोबत घटस्फोट घेतल्यानंतर गर्लफ्रेंड शोभिता धुलिपालासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर आता समांथाच्या घरातही सनई-चौघडे वाजले आहेत. समांथा चा भाऊ डेव्हिडने लग्न केले आहे, ज्याचे फोटो समांथाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समांथा तिच्या भावाच्या लग्नासाठी अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील लेक जेनेवा शहरात पोहोचली होती. यावेळी तिनेवाईन रंगाचा स्टायलिश गाउन परिधान केला आहे. तिच्या हातात फूलांचा गुच्छ दिसत आहे. या फोटोंमध्ये ती तिच्या कुटुंबासोबत दिसत आहे. यावेळी ती खूप आनंदी असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
समांथाच्या या फोटोंवर सध्या लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. समांथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, ती लवकरच ‘सिटाडेल- हनी बनी’ या सीरिजमध्ये दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरिजमध्ये समांथा पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 7 नोव्हेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.





