समांथा आणि वरुण धवनच्या ‘सिटाडेल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Citadel Honey Bunny Trailer | ‘सिटाडेल हनी बनी’ या वेबसिरिजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सिरीजचा दमदार आणि ॲक्शनने भरलेला ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
या मालिकेत वरुण धवन आणि सामंथा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘सिटाडेल’ वेबसीरिजच्या मागील एका आवृत्तीत अभिनेत्री प्रियंका चोप्राने काम केलं होतं. आता पहिल्यांदाच ‘सिटाडेल’ या गाजलेल्या वेबसीरिजची भारतीय आवृत्ती लवकरच रिलीज होणार आहे.
‘सिटाडेल हनी बनी’च्या ट्रेलरमध्ये समांथा (हनी) तिच्या मुलीला समजावताना दिसते. ती तिच्या मुलीला एका पेटीत बंद करुन तिच्या कानावर हेडफोन लावते आणि गुंडांचा सामना करते. पुढे वरुण धवनची (बनी) बाईकवर स्टाईलमध्ये एन्ट्री होते. वरुण समांथाला तिच्या टीममध्ये जॉईन करतो. त्यानंतर हनी-बनी मिळून एका मिशनवर जातात. तिथे गुंडांचा सामना करुन हनी-बनी यशस्वी होतात का? हे सीरिज रिलीज झाल्यावरच बघायला मिळेल.
‘फॅमिली मॅन’ फेम राज आणि डिके यांनी ‘सिटाडेल हनी बनी’चं दिग्दर्शन केले आहे. वरुण धवन आणि सामंथासह यात के.के. मेनन, सिमरन, साकिब सलीम, सिकंदर खेर, सोहम मजुमदार, शिवंकीत परिहार आणि काशवी मजमुदार यांचाही समावेश आहे. सिटाडेल: हनी बनीचा प्रीमियर 7 नोव्हेंबर रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
“स्थगिती सरकार गेल्यानंतर गतीचं अन् प्रगतीचं सरकार आलं” ; देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर सडकून टीका





