सर्वोच्च बलिदानाला सलाम ! पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

Operation Sindoor | पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. धर्म विचारून पुरूषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. अनेक माता-भगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. त्यादृष्टीने भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्री अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपविण्यात यश आले आहे. त्यानंतर बुधवारी पहाटे पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार, तोफा डागण्यास सुरुवात केली आहे. यात भारतीय जवान शहीद झाले आहे. Operation Sindoor |
Lance Naik Dinesh Kumar of 5 Field Regiment laid down his life on 07 May during Pakistan Army shelling.
We also stand in solidarity with all victims of the targeted attacks on innocent civilians in Poonch Sector: Indian Army’s White Knight Corps pic.twitter.com/l1ICtpQj4A— ANI (@ANI) May 7, 2025
पूँछमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचे जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाले होते. मात्र रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जवानाच्या मृत्यूची अधिकृत माहिती व्हाईट नाईट कॉर्प्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. Operation Sindoor |
ज्यात म्हंटले की, “जीओसी आणि व्हाईट नाईट कॉर्प्सचे ऑल रँक ५ व्या फील्ड रेजिमेंटचे लान्स नाईक दिनेश कुमार यांच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम, त्यांनी ७ मे २५ रोजी पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात आपले प्राण गमावले.” गुरुवार दिनेशचे पार्थिव पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात आणले जाईल, जिथे त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील.
दरम्यान, एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून पुँछ, राजौरी आणि उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात गोळीबार सुरुच आहे. Operation Sindoor |
दिनेश कुमार शर्मा कोण?
लान्स नायक दिनेश कुमार शर्मा हे मूळचे हरयाणातील पलवाल येथील रहिवासी होते. दिनेश कुमार शर्मा हे 2014 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाले होते. सध्या ते पूंछ येथे कार्यरत होते. नुकतीच त्यांना लान्स नायक पदावर बढती मिळाली होती. त्यांची पत्नी सीमा या वकील आहे. त्यांना दोन मुलं असून सध्या त्या गरोदर आहेत.
15 नागरिकांचा मृत्यू, 43 जण जखमी
ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लष्करी कारवाई झाल्यानंतर, पाकिस्तानने बुधवारीही युद्धबंदीचे उल्लंघन केले, नागरी भागात गोळीबार केला आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण केली. जम्मू-कश्मीरमधील पुंछ आणि तंगधार परिसरात मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या या गोळीबारात 4 मुलांसह 15 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले आहेत. यामुळे सीमावर्ती गावांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
पुंछ जिल्ह्यातील बालाकोट, मेंढर, मनकोट, कृष्णा घाटी, गुलपुर, केरनी आणि पुंछ शहरात गोळीबाराचा सर्वाधिक फटका बसला. यामुळे अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झालं. उरी सेक्टरमध्ये 5 मुलांसह 10 जण जखमी झाले, तर कुपवाड्यातील करनाह सेक्टरमध्ये अनेक घरांना आग लागली. पुंछ बस स्थानकही गोळीबाराच्या तडाख्यात सापडले आहे. Operation Sindoor |
हेही वाचा:





