पुणे | महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य प्रा. डॉ. हर्ष जगताप, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. अविनाश कुंभार, रासेयोचे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले, संचालक व विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रवीण भोळे आदी मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात ललित कला केंद्र, (गुरुकुल) प्रस्तुत नाम महिमा या नामस्मरणविषयक भक्तिगीतांची मैफल संपन्न झाली.
या मैफलीची मूळ संकल्पना हेमा देशपांडे यांनी मांडली होती, तर निर्मिती डॉ. चैतन्य कुंटे यांनी केली. याप्रसंगी गार्गी काळे, गायत्री चौधरी, देवयानी केसरकर, मृण्मयी जोशी, स्वप्निल राठोड ह्यांनी नामस्मरण विषयक भक्तिगीतांचे गायन केले,
तर ऋतुराज धूपकर- हार्मोनियम, मानस रासने – बासरी, रिया पितळे – व्हायोलीन, सुयोग चौधरी- पखवाज, सूर्याक्ष शर्मा व हरीश नखाते- तबला, प्रथमेश बनसोडे – टाळ याची त्यांना साथ लाभली. शुभांगी दंताळे यांनी या मैफलीचे निवेदन केले. याप्रसंगी शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


