सलून, ब्यूटीपार्लरही सुरू होणार
Updated On:

पुणे – राज्यातील रेडझोनसह सर्व भागातील मॉल्स आणि कॉम्प्लेक्स वगळता अन्य ठिकाणची 33 टक्के दुकाने खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर कटिंग सलून आणि ब्यूटीपार्लरही काही अटींसह मान्यता देण्यात आली आहे.
त्याचबरोबर बागा, क्रीडांगणे, फुटपाथवर व्यायाम करण्यास सकाळी 5 ते सायं. 7 या काळात मान्यता देण्यात आली आहे. मात्र कोणतीही गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.





