‘सुलतान’साठी सलमान खानने ठेवली होती, अनोखी ‘अट’

Salman Khan Movies । जेव्हा कोणी करिअर सुरू करतो तेव्हा त्याला फी म्हणून काहीही दिले जाते. पण तो अभिनेता प्रसिद्ध झाला तर तो त्याच्या इच्छेनुसार फी आकारू लागतो. सलमान खान देखील अशाच स्टार्सपैकी एक आहे. आज सलमान खान एका चित्रपटासाठी 60-70 कोटी रुपये फी घेतो, पण एक चित्रपट असा होता ज्यात त्याने फी घेतली नाही तर एक अट ठेवली.
त्या चित्रपटाचे नाव होते ‘सुलतान’ जो 2016 साली आला होता आणि तो रिलीज होऊन 8 वर्षे झाली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड नफा कमावला होता आणि सलमानला याची आधीच कल्पना होती, त्यामुळे फी न घेता त्याने एक अट ठेवली होती
सुलतान हा चित्रपट 6 जुलै 2016 रोजी प्रदर्शित झाला होता, ज्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले होते आणि हा चित्रपट यशराज बॅनरखाली बनवण्यात आला होता. या चित्रपटात सलमान खानने कुस्तीपटूची भूमिका साकारली होती आणि अनुष्का शर्मा या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होती. या चित्रपटासाठी सलमान खानने 100 कोटी रुपये फी म्हणून घेतल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे, परंतु काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की सलमानला 100 कोटी रुपये मिळाले होते पण ते त्याच्या अटीनुसार होते.
रिपोर्टनुसार, सुलतान चित्रपटाचे बजेट 80 कोटी होते तर चित्रपटाचे जगभरात 601.87 कोटींचे कलेक्शन होते. असे म्हटले जाते की, सलमानने चित्रपटातील नफ्याची काही टक्के रक्कम मागितली होती आणि त्याची फी नाही आणि त्याला खात्री होती की हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल. असेच झाले आणि सलमानला जवळपास 100 कोटी रुपये देण्यात आले. याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही.
Salman Khan Movies । सलमान खानने दिला बॅक टू बॅक दिले ब्लॉकबस्टर
2009 मध्ये सलमान खानचा वॉन्टेड हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यानंतर ‘दबंग’ (2010), ‘रेडी’ (2011), ‘बॉडीगार्ड’ (2011), ‘एक था टायगर’ (2012), ‘किक’ (2014), ‘बजरंगी भाईजान’ (2015), ‘सुलतान’ ‘ (2016), ‘टायगर जिंदा है’ (2017) आणि त्या काळात सलमान बॉक्स ऑफिसचा बादशहा बनला. मात्र, 2017 नंतर सलमानचे काही चित्रपट हिट झाले पण त्याचा करिश्मा परत आला नाही.





