सलमान खानचा ‘सिकंदर’ रिमेक आहे की ओरिजीनल? दिग्दर्शकाने स्वत: सांगितले स्पष्ट

Sikandar Film | सुपरस्टार सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात रश्मिका मंदाना देखील मुख्यभूमिकेत झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. ‘सिकंदर’ रिमेक आहे की ओरिजीनल याविषयी मौन सोडले आहे. सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपटाचा रीमेक नाही तर पूर्णपणे मूळ कथा असलेला आहे.
ए.आर.मुरुगोदास म्हणाले की, “हा सिनेमा पूर्णतः एका ओरिजिनल कथेवर बनवला गेला आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन ऑथेंटिक पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक नवीन आणि फ्रेश अनुभव मिळेल. हा सिनेमा रिमेक नाही. सिनेमाचं संगीत, अॅक्शन, इमोशनल सीन्स या प्रत्येक गोष्टी प्रेक्षकांना आवडतील याची आम्हाला खात्री आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या सिनेमात सत्यराज मिनिस्टर, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर हे कलाकारही झळकणार आहे. ए. आर. मुरुगोदास यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं तर साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. २०२५ च्या ईदमध्ये पुढील महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. Sikandar Film |
त्याआधी या चित्रपटातील पहिले गाणे ‘जोहरा जबीं’ रिलीज झाले आहे. रिलीज होताच या गाण्याने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. जबरदस्त बीट्स, शानदार कोरियोग्राफी आणि सलमान खानचा पठानी सूटमधील लूक या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. यासोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील सलमान सोबत डान्स करताना दिसत आहे.
या गाण्यामध्ये दोन्ही कलाकारांची अप्रतिम केमेस्ट्री दिसून आली आहे. सलमान शेवटचा 2023 मध्ये आलेल्या ‘टायगर -3’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यामुळे ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sikandar Film |
हेही वाचा:
‘लोकं मला ‘ओव्हरसाईज’, ‘जाड’ म्हणतात; पण…’, महिलांसाठी अपूर्वा नेमळेकरची खास पोस्ट





