Varun Dhawan And Salman Khan| अभिनेता वरूण धवन ‘बेबी जॉन’ या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ‘बेबी जॉन’ सिनेमात बॉलीवूडचा ‘दंबग’ अर्थात सलमान खान दमदार कॅमिओ करताना दिसणार आहे. दिग्दर्शक ॲटलीने शाहरुखसोबत ‘जवान’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट केल्यानंतर आता तो सलमान खानसोबत काम करण्यास सज्ज होणार आहे.
या चित्रपटातून साऊथ स्टार कीर्ती सुरेश वरुणसोबत डेब्यू करणार आहे. तर जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी आणि सान्या मल्होत्रा यात दिसणार आहेत. सलमान खान ॲटलीच्या प्रोजेक्ट ‘बेबी जॉन’मध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे. वरुणचा हा चित्रपट एक ॲक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये सलमान वरुणसोबत ॲक्शन सीनमध्ये दिसणार आहे.
सलमान आणि वरुण धवन याआधीही पडद्यावर एकत्र दिसले आहेत. वरुणच्या ‘जुडवा 2’मध्ये सलमानने कॅमिओ केला होता. या दोनकलाकारांनी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी लोकही खूप उत्सुक असतील.’बेबी जॉन’ सिनेमा २५ डिसेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे सलमान खानने काहीच दिवसांपूर्वी ‘सिकंदर’ सिनेमाची घोषणा केली. त्यामुळे सलमानच्या या चित्रपटाबाबत देखील चाहते उत्सुक आहेत.
हेही वाचा :
रणबीर कपूरने केले ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाचे शूटिंग सुरु