Salman Khan: सलमान खानचा जल्लोष; कुटुंबासह बाप्पाचे विसर्जन, डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Salman Khan: बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीचा सण आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सलमान आणि खान कुटुंबानं बाप्पाचं धूमधडाक्यात स्वागत केलं होतं. आता विसर्जनाच्या दिवशी सलमाननं बहिण अर्पिता, मेहुणा आयुष शर्मा आणि इतर कुटुंबीयांसोबत बाप्पाला निरोप दिला.
या सोहळ्यात सलमान खान मोठ्या उत्साहानं डान्स करताना दिसला. सोशल मीडियावर त्याचा हा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये सलमानसोबत त्याची बहिण अर्पिता, आयुष शर्मा, तसेच जहीर खानसुद्धा डान्स करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
डान्सदरम्यान सलमान एका लहान मुलाकडे पाहून प्रेमानं हसताना आणि त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवतानाही दिसला. त्यामुळे चाहत्यांना सलमानचा हा दिलखुलास अंदाज खूप भावला.
फक्त डान्सच नव्हे तर खान कुटुंबानं एकत्र येऊन आरती केली. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अर्पिता आणि आयुष शर्मा गणपतीची आरती करताना दिसतात, तर बाकी सदस्य भक्तिभावानं सहभागी झालेले दिसतात. हे सर्व क्षण पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्यानं लिहिलं, “गणपतीच्या भक्तांना सलाम,” तर दुसऱ्यानं “सलमान भाई लव्ह यू” असं लिहिलं. अनेकांनी कॉमेंट्स करून आपला आनंद व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खाननं कुटुंबासह बाप्पाचं आगमन आणि विसर्जन मोठ्या जल्लोषात पार पाडलं. आता त्याचे हे व्हायरल व्हिडिओ चाहत्यांसाठी खास आनंदाचा क्षण ठरले आहेत.





