सलमान खानने बदलले आपल्या रोलचे नाव

पोलिसवाला हिरो आपल्या प्रेक्षकांनी “सिंबा’ शिवाय इतक्यात बघितला नव्हता. आता सलमान खानचा “दबंग 3′ लवकरच येतो आहे. त्याच्या टीझरमधून सलमान खानने एक भन्नाट अनाउन्समेंट करून टाक्ली आहे. “दबंग 3′ रिलीज होईपर्यंत तो ट्विटर हॅन्डलचे नाव आपल्या रोलच्या नावाने, म्हणजे चुलबुल पांडे हेच नाव ठेवणार असल्याचे सलमानने जाहीर करून टाकले आहे.
ट्विटरवर टीझर रिलीज करतानाच त्याने ही घोषणा करून टाकली. सलमानच्या “दबंग’ सिरीजला जेंव्हापासून सुरुवात झाली, तेंव्हापासूनच चुलबुल पांडे हे नाव लोकप्रिय झाले होते. आता “दबंग 3′ येईपर्यंत सलमानला ट्विटरवर चुलबुल पांडे म्हणूनच ओळखले जावे, ही त्याची आयडिया सिनेमाचे प्रचंड प्रमोशन करणार आहे. सलमानने रिलीज केलेल्या टीझरमधील लुक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. या टीझरमध्ये तो नेहमीसारखाच डॅशिंग दिसतो आहे. यावर्षी सलमानचा “भारत’ नंतर “दबंग 3’हा बहुप्रतिक्षित सिनेमा ठरला आहे. यापूर्वीच्या दोन्ही “दबंग’मध्ये सोनाक्षी सिन्हा सलमानची हिरोईन होती. आता आणखी एक हिरोईन सलमानबरोबर असणार आहे. महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. “दबंग 3′ हिंदीबरोबर कन्नड, तमिळ आणि तेलगूमध्ये 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.





