मुंबई : शनिवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून घेण्यात आली. लॉरेन्स हा गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. पण तरी देखील तो त्यांचं नेटवर्क चावलत आहे. तो आपल्या शूटरच्या माध्यामातून या हत्या करत आहे. एनआयएच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने त्याचे 5 टार्गेट कोण कोण आहेत याचा खुलासा केला होता. चला तर मग जाणून घेवुयात यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. 1) सलमान खान या यादीमध्ये सगळ्यात पहिले नाव आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचे. लॉरेन्स बिश्नोई याने एनआयएसमोर कबुली दिली होती की, सलमान खानला मारायचे आहे. त्यामागचे कारणही त्याने सांगितले होते. त्याने म्हटले होते की, काळवीट शिकार प्रकरणामुळे तो सलमान खानवर नाराज आहे. लॉरेन्सने जी कबुली दिली तेच त्याने घडवून आणले. सलमान खानवर हल्ला करण्यासाठी दोनदा रेकी करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 2) सगुनप्रीत सिंग लॉरेन्सच्या हिट लिस्टवर असलेलं आणखी नाव म्हणजे सगुनप्रीत, पंजाबी गायक सिद्धू मूसावाला याचा तो मॅनेजर होता. लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती विक्की मिड्डूखेडावर गोळीबार करणाऱ्या शुटर्सना त्याने आश्रय दिला होता. मोहालीत मिड्डूखेडाची हत्या झाली होती. लॉरेन्स गँग विकी मिड्डूखेडा यांना आपला भाऊ मानत होती. 2021 मध्ये मिड्डूखेडा यांची हत्या झाली होती. 3) गँगस्टर मनदीप धालीवाल लॉरेन्सच्या हिटलिस्टमध्ये गँगस्टर मनदीप धालीवाल याचे देखील नाव आहे. धालीवाल हा बंबिहा टोळीचा म्होरक्या लकी पटियालच्या जवळचा व्यक्ती आहे. लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला सांगितले होते की, त्याला मनदीपचा खून करायचा आहे. कारण त्याने विकी मिड्डूखेडाच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यातही मदत केली होती. त्याने आपल्या गँगचे नाव ‘ठग लाईफ’ असे ठेवले आहे. 4) गँगस्टर कौशल चौधरी कौशल चौधरी सध्या गुरुग्रामच्या तुरुंगात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा तो कट्टर शत्रू आहे. बिश्नोईला त्याला मारायचे आहे. लॉरेन्सच्या कबुलीनुसार, कौशल चौधरीने विकी मिड्दुखेडा, भोलू शूटर, अनिल लठ आणि सनी लेफ्टी यांच्या मारेकऱ्यांनाही शस्त्रे पुरवली होती. कौशल चौधरी हा अतिशय कुख्यात गुंड मानला जातो. 5) अमित डागर अमित डागर हा बंबीहा टोळीचा प्रमुख आहे. ही लॉरेन्स बिश्नोईची प्रतिस्पर्धी टोळी आहे. त्यांनी विकीच्या हत्येचा कट रचला होता. लकी पटियाल गँग माझी शत्रू असल्याचे लॉरेन्सने एनआयएला सांगितले होते. लकीच्या सांगण्यावरूनच माझा जवळचा मित्र आणि गोल्डीचा भाऊ गुरलाल ब्रारचा खून झाला. बंबीहा टोळीनेच विक्की मिड्डूखेडाच्या शूटर्स आणि रेकींना लपण्यासाठी मदत केली होती.