‘दिल दियां गल्लां…’ गाण्यावर सलमान आणि तमन्नाचा रोमॅंटिक डान्स

Salman khan and Tamannaah | कतारची राजधानी दोहा येथे ही दबंग रिलोडेड टूर आहे. जिथे हजारो चाहत्यांनी बॉलीवुडच्या या धमाकेदार शोचा आनंद लुटला. यावेळी अभिनेता सलमान खान सोबत तमन्ना भाटिया आणि इतर कलाकार देखील उपस्थित आहेत. सध्या सलमान आणि तमन्नाचा डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दोहा येथे परफॉर्मन्सवेळी सलमान खान आणि तमन्ना भाटियाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सलमानच्या सुपरहिट गाण्यांवर सर्वांना परफॉर्म केलं.
सलमानने स्वत: ‘ओ ओ जाने जा ना’,’स्वॅग से स्वागत’,’दीदी तेरा देवर दीवाना’,’कभी तू छलिया लगती हो’,’जीने के है चार दिन’ या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्म केलं. ‘दिल दियां गल्लां’वर परफॉर्म करताना व्हीडिओमध्ये तमन्ना लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये एकदम हॉट दिसत आहे. तर ब्लॅक सूट बूटमध्ये सलमान खान डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे. यावेळी अनेकांनी कॅटरीना कैफची आठवण आल्याचे म्हंटले.
View this post on Instagram
तर दोघांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांना एकत्र चित्रपट करण्याचा सल्ला दिला आहे. दोघांनी अद्याप एकत्र काम केलेलं नाही. ‘सलमान खान आणि तमन्ना ही बेस्ट जोडी आहे’,’एकत्र सिनेमा करा’ अशा कमेंट्स आल्या आहेत. सलमानसोबत तमन्ना भाटिया, जॅकलीन फर्नांडिस, सुनील ग्रोवर, मनीष पॉल, स्टेबिन बेन हे देखील या टूरवर आहेत. Salman khan and Tamannaah |
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘बॅटल ऑफ गलवान’ या आगामी सिनेमात दिसणार आहे. यात सलमान शहीद कर्नल बी संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय सध्या तो बिग बॉस १९ शो होस्ट करत आहे. Salman khan and Tamannaah |
हेही वाचा :





