चित्रपटाच्या पोस्टरवरून सलील कुलकर्णी संतप्त

मुंबई – ‘बॉइज’, ‘बॉइज २’च्या यशानंतर आता विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘गर्ल्स’ हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मराठी संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांना ‘गर्ल्स’ चित्रपटाचे पोस्टर खटकल्याचे दिसून येत आहे.
या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये नवोदित अभिनेत्री अंकिता लांडे दिसत आहे. मात्र तिच्या टी-शर्टवर ‘आयुष्यावर बोलू काही’ अशी टॅगलाईन दिली असून असभ्य हालचाली केल्या आहेत. त्यामुळे सालील यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
‘आयुष्यावर बोलू काही’ हा स्टेज शो रसिकांचे अविरत मनोरंजन करत आहे. त्यामुळे या स्टेज शोचे नाव टॅगलाईन म्हणून वापरून असभ्य हालचाली करणार हे पोस्टर अजिबात योग्य नाही आहे, असं सलील यांनी सांगितलं आहे.
सलील कुलर्णी यांनी नाराजी व्यक्त करताच अनेक चाहत्यांनीही यावर टीका केली आहे. “आयुष्यावर बोलू काही ” या शोच्या नावाचा अशा प्रकारे वापर करणे हे योग्य नसल्याचेही सोशल मीडियावर प्रतिक्रीया उमटत आहेत.





