‘पंतप्रधान मोदींमुळे बांगलादेशातील हिंदू वाचले’ ; उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांचा मोठा दावा

Sakshi Maharaj on Bangladesh । उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचारावर मोठा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे त्याठिकाणच्या हिंदूंचे प्राण वाचले, असे त्यांनी म्हटले. तसेच “बांगलादेशात जे काही घडले, ती अत्यंत चिंतेची बाब आहे. तिथल्या घटना खूप वेदनादायी आहेत.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले Sakshi Maharaj on Bangladesh ।
बांगलादेशातील परिस्थितीवर बोलताना भाजप खासदार साक्षी महाराज यांनी,”मी एका शब्दात सांगतो, मोदींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले आहे, असा मोठा दावा केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अल्पसंख्यांकांबाबत रात्रंदिवस डोके वर काढणारे गप्प आहेत” असे म्हणत विरोधकांवर टीका देखील केली.
पुढे भाजप नेते म्हणाले की,”अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडी अल्पसंख्यांकांबद्दल बोलतात परंतु आजपर्यंत त्यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या बाजूने कोणतेही खुले विधान केलेले नाही” असे म्हणत टीका केली. तसेच साक्षी महाराज म्हणाले की, “भारतातील जनतेने हे समजून घेतले पाहिजे की त्यांचे समर्थक आणि रक्षक कोण आहेत.”
…तर जनतेने लक्ष देण्याची गरज Sakshi Maharaj on Bangladesh ।
भाजप खासदार म्हणाले की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात की हिंदू कमी केले तर त्यांना मारहाण केली जाईल, हिंदू कमी केले तर देशाची फाळणी होईल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. संघटित राहण्याची गरज आहे आणि आज मोदीजींनी बांगलादेशातील हिंदूंना वाचवले. पश्चिम बंगालच्या मुद्द्यावर साक्षी महाराज म्हणाले की, जर आपण तिथली लढाई लढत असू तर जनतेने लक्ष देण्याची गरज आहे.”
शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आल्यानंतर बांगलादेशमध्ये अनेक हिंदू मंदिरे, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. वादग्रस्त नोकरी कोटा प्रणालीवरून शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात हिंसक निदर्शने करून देश हादरला होता.





