Yugendra Pawar । सख्ख्या पुतण्याने अजित पवारांची साथ सोडली, शरद पवार म्हणाले…

Yugendra Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यानी बंडखोरी करत भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता अजित पवार यांचे यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
युगेंद्र पवार आज शरद पवार गटात प्रवेश करतील. या संदर्भात सोशल मीडियावर त्यांच्या पोस्ट व्हायरल होत आहे. पवार कुटुंबातील आणखी एका सदस्याने अजितदादांची साथ सोडल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा आहे. परंतु, खुद्द शरद पवार यांनाच या गोष्टीची कल्पना नसल्याचे दिसून आले.
दम्यान, शरद पवार पत्रकारांनी विचारले युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते तुमच्याकडे येताहेत, तुम्हाला काय वाटते यावर ते म्हणाले,’मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हेच मला माहिती नव्हते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे. ते अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास यांचे चिरंजीव आहेत. युगेंद्र हे अमेरिकेतून शिकून आलेले आहेत.’ अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
युगेंद्र पवार यांचा अजून राजकारणात अधिकृत प्रवेश झालेला नाही. पण युगेंद्र पवार यांचा कल शरद पवार गटाकडे आहे. हा अजित पवार गटासाठी एक धक्का मानला जातोय. कारण युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे सख्खे पुतणे आहेत.
Yugendra Pawar । कोण आहे युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार आहेत. आतापर्यंत ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात.
हेही वाचा
Yugendra Pawar । सुप्रिया सुळेंच्या प्रचाराबद्दल नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार ?
Divya Khosla । दिव्या खोसलाचा भूषण कुमारसोबत घटस्फोट होणार ?





