Nagar: भास्करगिरी बाबांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचे संतपूजन

नेवासा- आळंदी येथे शुक्रवारी आयोजित संत कृतज्ञता संवाद मेळाव्यात श्रीक्षेत्र देवगड गुरुदेव दत्तपीठाचे महंत भास्करगिरी बाबांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन संतपूजन करण्यात आले.
शुक्रवारी अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी येथे संत कृतज्ञता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय संत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज उर्फ किशोर व्यास महाराज यांनी संत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास वारकरी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यापक हभप मारुतीबुवा कुऱ्हेकर यांच्यासह महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रातील संत-महंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सोहळ्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे महंत भास्करगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शाल,तुळशी हार घालून विठ्ठल-रुख्मिणी मातेची मूर्ती भेट देऊन संतपूजन करण्यात आले. भास्करगिरी बाबांनी देखील देवगड संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करून शुभाशीर्वाद दिले.





