नगर – भगवंत नामाने जीवनातील दु:ख कमी होऊन आनंद निर्माण होत असतो. हेच संतांनी मनुष्याचे जीवन सुखी-समृद्ध होण्यासाठी आपल्या सत्वचनातून मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या वचनांप्रमाणे मनुष्याने वाटचाल केल्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. संत नामदेव महाराजांनी कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले. श्री संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सावेडी, येथे परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिला दुमाटे, उपाध्यक्ष दिलीप काकडे, सचिव राजू बगाडे, कृष्णा भस्मे, सुरेश लोळगे, राजू पाटकुले, महेश चोकटे, हेमा वडे, विनोद काकडे, किशोर वायचळ, अनिल वाव्हळ, कोशल चुंबळकर, प्रवीण पाटसकर, सुधीर नेवासकर, प्रफुलत्ता काकडे, परेश लोखंडे, नितीन शेलार, राजेंद्र बारस्कर आदी उपस्थित होते.