#फोटो : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संगमवाडी येथे आगमन
Updated On:

पुणे – पालखी सोहळ्यानिमित्त दोन दिवस शहरात मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांसाठी पुणे शहर सज्ज झाले आहे. यानिमित्त महापालिकेनेही विशेष नियोजन केले आहे. वारी काळात यंदाही स्वच्छतेवर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालकीचा मुक्काम विठोबा मंदिर तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम निवडुंग्या विठोबा मंदिरात असणार आहेत. या पालखीसाठी ही दोन विठोबांची मंदिरे सजली असून स्वागतासाठी पुणे सज्ज झाले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे संगमवाडी येथे आगमन झाले असून संगमवाडीतील भाविकांनी पालखीच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली आहे.
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संगमवाडी येथे आगमन
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संगमवाडी येथे आगमन
- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे संगमवाडी येथे आगमन








