Saina Nehwal : सायनाच्या ‘त्या’ निर्णयावर होतेय प्रचंड टीका
Updated On:

बेंगळुरू – राष्ट्रकुल, आशियाई तसेच उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या संघात थेट निवड करण्यात न आल्यामुळे संतापलेल्या सायना नेहवालने पात्रता स्पर्धेतून माघार घेतली होती. तिच्या या निर्णयावर सध्या प्रचंड टीका होत आहे.
फुलराणी नावाने प्रसिद्ध असलेली सायना एक अफलातून खेळाडू आहे; पण खेळापेक्षाही ती आता स्वतःला मोठी समजते का, असा सवाल आता चाहते करत आहे. 2012 सालच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक विजेती असलेली सायना आता निवृत्तीकडे झुकली आहे.
त्यामुळे तिच्यासह अनेक खेळाडूंना थेट प्रवेश देण्याएवजी पात्रता स्पर्धेत खेळण्याची सूचना भारतीय बॅडमिंटन संघटनेने केली होती. त्यावर नाराज होत सायनाने पात्रता स्पर्धेतूनच माघार घेत संघटनेवरच टीका केली होती. मात्र, हे बुमरॅंग तिच्यावरच उलटले आहे.





