सैफ अली खान प्रकरणी मिलिंद देवरा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; पत्रातून केली ‘ही’ मोठी मागणी

Saif Ali Khan Attack । अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी अवैधरित्या राज्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना राज्यातून हाकलून लावण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवरा यांनी, “मुंबईत राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी, बांगलादेशी घुसखोरांना राज्यातून हाकलून लावणे आवश्यक आहे.” असे म्हटले आहे.
मिलिंद देवरा यांनी माध्यमांशी बोलताना, “मुंबईच्या सुरक्षेचा विचार करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, “जिथे जिथे बांगलादेशी कोणत्याही कागदपत्रांशिवाय अवैधपणे राहत आहेत, त्यांनातिथून हाकलून देण्यात यावे. यावेळी मिलिंद देवरा यांनी सैफ अली खानच्या घरी घडलेल्या घटनेचे वर्णन अस्वस्थ करणारे केले. ते म्हणाले की, मुंबई शहर सुरक्षित ठेवण्याची गरज आहे.”असे त्यांनी म्हटले.
सर्व स्थलांतरितांचे ऑडिट करणे आवश्यक Saif Ali Khan Attack ।
अशा परिस्थितीत त्या सर्व स्थलांतरितांचे ऑडिट करणे खूप महत्वाचे आहे, असेही देवरा यांनी यावेळी म्हटले. तसेसाज जे राज्यात राहून आपल्या विरोध अशा घडवतात. मुंबईतील वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरावर हल्ला झाला होता, ज्यामध्ये एका बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकाचे नाव समोर आले आहे, ज्याला मुंबई पोलिसांनी खूप प्रयत्नांनंतर अटक केली.
महाराष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी Saif Ali Khan Attack ।
मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर त्यांचे पत्र शेअर केले आणि लिहिले की महाराष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे. अशा लोकांना कोणत्याही पडताळणीशिवाय नोकरी देणाऱ्या आणि नोकरी देण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची पडताळणी न करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा
Walmik Karad | संतोष देशमुख प्रकरणातील अपडेट समोर; वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी





