Saif Ali Khan | Malaika Arora – मुंबई येथील स्थानिक न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्री मलायका अरोराविरोधात पुन्हा एकदा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे प्रकरण अभिनेता सैफ अली खानशी संबंधित आहे. 13 वर्षांपूर्वी, सैफ आणि त्याच्या दोन मित्रांवर मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका व्यावसायिकासह त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. त्यावेळी मलायका देखील सैफसोबत उपस्थित होती, परंतु ती साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर झाली नाही. कोर्टाने या प्रकरणी पहिल्यांदा 15 फेब्रुवारी रोजी मलायका अरोराविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सोमवारी ती न्यायालयात हजर राहिली नाही. त्यानंतर हे पुन्हा वॉरंट जारी करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होईल. काय आहे संपूर्ण प्रकरण? ही घटना 22 फेब्रुवारी 2012 रोजी घडली होती. सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूर खान, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि इतर अनेक पुरुष मित्रांसह उपस्थित होता. सर्वजण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा शर्माने अभिनेता आणि त्याच्या मित्रांच्या मोठ्याने बोलण्यावर आक्षेप घेतला तेव्हा सैफ अली खानने त्याला धमकावले आणि त्याच्या नाकावर ठोसा मारला, ज्यामुळे त्याचे नाक फ्रॅक्चर झाले. एनआरआय व्यावसायिकाने सैफ आणि त्याच्या मित्रांवर त्याच्यावर आणि त्याच्या सासऱ्या रमन पटेलवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी सुनावणी सुरु आहे. सैफनेही केले आरोप सैफने दावा केला होता की, इक्बालने तिथे उपस्थित महिलांवर अश्लील कमेंट पास केल्या होत्या. त्यामुळे हाणामारी झाली. या प्रकरणात पोलिसांनी 21 मार्च 2012 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. ज्याअंतर्गत सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांना भारतीय दंड संहितेच्या कलम 325 (जाणीवपूर्वक गंभीर दुखापत करणे) आणि कलम 34 (हल्ला) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.