Saie Tamhankar | सई ताम्हणकरचे बोल्ड फोटोशूट

Saie Tamhankar | सई ताम्हणकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. याशिवाय तिने बॉलीवूडमध्ये देखील उत्तम कामगिरी केली आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
तिने अलीकडेच खास फोटोशूट शेअर केले आहे. सईने तिच्या ‘समिंद्री’ या पात्राच्या प्रमोशनसाठी हटके फोटोशूट केले आहे. सईने गुडघाभर पाण्यात उतरुन या ग्लॅमरस ड्रेसमध्ये फोटोशूट केले. ‘समिंद्री: ज्या गोष्टीमुळे ती बुडाली, त्या गोष्टीमधूनच ती शिकली’, असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, ‘मानवत मर्डर्स’ या सीरिजमध्ये सईच्या पात्राचे नाव ‘समिंद्री’ असे आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सईसह या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
‘मानवत मर्डर्स’शिवाय सई ‘ग्राउंड झिरो’, ‘गुलकंद’, ‘अग्नी’, ‘डब्बा कार्टेल’, ‘मटका किंग’ या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे. यापूर्वी सई अभिनेत्री क्रीती सेनॉनसोबत ‘मिमी’ या हिंदी सिनेमात दिसली होती. सरोगसी या विषयावर आधारीत या सिनेमात शमा आणि मिमी या दोन मैत्रिणींमधील बाँडिग दाखवण्यात आले होते.





