सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी स्वीमसूटमध्ये; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Sai Pallavi Troll | दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी तिची बहीण पूजा कन्ननसोबत व्हेकेशनवर गेली आहे. दोघी बहिणी बीचवर एन्जॉय करत आहेत. येथील दोघीचे काही फोटो पूजाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. यात साई पल्लवीने स्वीमसूट घातल्याने तिच्यावर टीका होत आहे.
कारण आगामी ‘रामायण’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. तर रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु माता सीतेच्या भूमिकेतील साईने असे कपडे घालणे काही जणांना खटकले आहे.
साई पल्लवीची बहीण पूजानं दोघींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले करत “बीच हाय, सनकिस्ड”, असं कॅप्शन दिलं आहे. यावर कमेंट करत एका युजरनं म्हटले की, “पडद्यावर पारंपारिक लूक कॅरी करणारी साई पल्लवी खऱ्या आयुष्यात बिकिनी घालते.” दुसऱ्या युजरनं लिहिले की, “ती इतर हिरोईन्ससारखी आहे हे सिद्ध होतं.” तर काहींनी तिला पाठिंबा देखील दिल्याचे पाहायला मिळाले. Sai Pallavi Troll |
View this post on Instagram
चाहत्यांचे ट्रोलर्सला उत्तर
साई पल्लवीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. ‘स्वीमिंग करताना किंवा बीचवर तिने साडी नेसायला हवी का?’ अशा कमेंट्स केल्या आहेत. अलिकडेच, निर्मात्यांनी साई पल्लवी ‘रामयण’मधील फर्स्ट लूक शेअर होता. मोठ्या पडद्यावर सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार म्हणून अनेकजण खूश झाले होते. तिच्या साधेपणाचे कौतुक देखील करण्यात आले. मात्र आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. Sai Pallavi Troll |
हेही वाचा:
भारताने पाकच्या विमान कंपन्या अन् विमानांवरील बंदी वाढवली ; 6 महिन्यांपासून लागू आहे बंदी





