‘साहेब की दादा’ नवाब मलिक कुणासोबत ? एक्स पोस्टमधून दिल ‘उत्तर’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील जनसन्मान यात्रा काढण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून सुद्धा बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
अशात नुकतेच नवाब मलिक दीड वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले आहे. यातच ते नेमकं येत्या विधानसभेत कुणासोबत असणार असा प्रश्न चर्चेत आला आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.
आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं।
Happy Independence Day!#IndependenceDay #Independence pic.twitter.com/A4fg1irMVG
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) August 15, 2024
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करताना आगामी काळात ते कोणासोबत महाराष्ट्रात राजकारण करणार आहेत, हे त्यांच्या पोस्टवरून स्पष्ट झाले आहे.





