Muzaffarnagar Riots Case : दंगल प्रकरणात ‘साध्वी प्राची’ यांची शरणागती

मुझफ्फरनगर – मुज्जफरनगर दंगलीबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी शुक्रवारी येथील विशेष खासदार/आमदार न्यायालयात शरणागती पत्करली आहे.
प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि चिथावणी देण्याच्या प्रकरणात त्यांच्या विरूद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. पण त्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीशी संबंधीत हे प्रकरण आहे. त्यांनी शरणांगती पत्करल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/karnataka-hc-allows-inauguration-of-112-ft-adiyogi-statue-by-vice-president-in-chikkaballapura-district/
केंद्रीय मंत्री संजीव बल्यान, साध्वी प्राची, भाजपचे माजी खासदार भारतेंदू सिंग, माजी भाजप आमदार उमेश मलिक, गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पुजारी आचार्य नरशिगानंद आणि माजी ब्लॉक प्रमुख वीरेंद्र सिंग यांच्यासह अनेक आरोपींवर या प्रकरणात प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/old-pension-scheme-to-be-implemented-in-himachal-pradesh/
ऑगस्ट 2013 मध्ये नागला मादोर गावातील महापंचायती मध्ये आरोपींनी भाग घेतला आणि त्यांच्या भाषणाने हिंसाचार भडकला असा त्यांच्यावर आरोप आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये मुझफ्फरनगर आणि लगतच्या भागात झालेल्या जातीय संघर्षात 60 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 40,000 हून अधिक लोक विस्थापित झाले होते.





