‘साडे माडे तीन’च्या सिक्वेलची घोषणा; प्रसिद्ध अभिनेता सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा

Saade Maade Teen Sequel| मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अंकुश चौधरीला ओळखला जातो. उत्तम अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासह तो एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे. ‘साडे माडे तीन’, ‘झक्कास’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन अंकुशने केले आहे. यानंतर आता तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे.
17 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनं जिंकले होते. या चित्रपटातील अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे हे कुरळे ब्रदर्स सगळ्यांनाच भावले होते. यातच आता ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. यात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय, या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. Saade Maade Teen Sequel|
पुढील महिन्यात अर्थात सप्टेंबरपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं होतं. प्रेक्षकांचे या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले होते. यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा:
पुन्हा होणार धमाल; ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा दुसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस





