“शरद पवारांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ ठेवावे, त्यांचे संपूर्ण आयुष्य आग लावण्यातच गेले”
Updated On:

सोलापूर – शरद पवार यांचे संपूर्ण आयुष्य आगी लावण्यातच गेले आहे. त्यामुळे त्यांनी आपले आडनाव बदलून आगलावे करावे, अशी जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केली आहे.
सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळा संबंधी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काहीच केलेले नाही.
जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचे. यांचे संपूर्ण आयुष्य हे आग लावण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून आगलावे करावे, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. हे राज्य होरपळून निघाले असून आता थांबले पाहिजे, अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली आहे.





