Mangal Narayan Nangre Patil passes away : पोलीस खात्यातील एक तडफदार पोलीस अधिकारी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचलाक विश्वास नांगरे पाटील यांच्या आईचे निधन झाले आहे. त्यांची आई श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचे निधन झाल्याची माहिती सांगलीतील शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजीत देशमुख यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. त्यांचे निधन वृद्धपकाळाने झाले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आज मन अत्यंत जड झालं आहे. आमच्या सर्वांच्या लाडक्या, माझे मित्र श्री विश्वास नांगरे पाटील आणि श्री विकास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगलकाकी नांगरे पाटील आपल्यातून गेल्या. सकाळपासून मन अस्वस्थ होते. मी शिराळ्याला गेलो आणि का माहीत नाही वाटले कोकरुडला जावे आणि मंगल काकीना भेटावे. मी तडक मागे फिरलो आणि परत कोकरुडला गेलो आणि थेट काकूंचा घरी गेलो. काकीना डोळे भरून पाहिले, त्यांची प्रकृती खूप खालावलेली, खूप काळजी वाटली. त्याना पाहून आज मला माझ्या आईची खूप आठवण आली. मी परत शिराळ्याला गेलो आणि पाठोपाठ तीर्थरूप मंगल काकींची दुःखद बातमी समजली. खूप धक्का बसला. जसं काय शेवटचे त्याना मला भेटायचे होते. अजून ही विश्वास बसत नाही. आई म्हणजे सर्वांचं मायेचं आभाळ असते, तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबाच्या हृदयात एक शून्य निर्माण होतो, असा शून्य जो शब्दांनी भरता येत नाही. काकींचा शांत स्वभाव, त्यांचे संस्कार, त्यांची निस्वार्थ माया…हे सगळं आयुष्यभर मला आठवणीत राहील, अशी भावना सत्यजीत देशमुख यांनी पोस्टद्वारे व्यक्त केली. अशा माणसांचं जाणं म्हणजे फक्त निधन नाही ती एक युगाची हळवी समाप्ती असते. ईश्वर त्यांच्या दिव्य आत्म्यास चिरशांती देवो. या कठीण प्रसंगातून कुटुंबाला धीर, आधार आणि सामर्थ्य मिळो हीच मन:पूर्वक प्रार्थना, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी देखील फेसबुकवरून अनंत झेंडे पाटील यांनी लिहिलेली पोस्ट रिशेअर करत अनंत, धन्यवाद माझ्या आईबद्दल उत्कट भावना व्यक्त केल्याबद्दल माहीत आहे आता आईची हाक पुन्हा कधी ऐकायला मिळनार नाही. पण तिने जोडलेल्या असंख्य ऋणानुबंधाचा गोडवा आजन्म रिता होणार नाही, असे विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे. हेही वाचा : बिहारमध्ये दारुण पराभव; काँग्रेसचं भवितव्य काय? शरद पवार म्हणतात “मला जो काँग्रेस पक्ष समजतो तो…”