दुःखद बातमी! अलका कुबल यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीने घेतला जगाचा निरोप

Alka Kubal : मराठी सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अलका कुबल यांचे मोठे भाऊ आणि ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
वसंत कुबल यांनी वयाच्या ६५ व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांना पक्षाघाताचा त्रास होता. मुंबईतील राहत्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालावली आहे. शनिवारीच त्यांच्यावर मुंबईत अत्यंसंस्कार पार पडले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजताच मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीत संकलक म्हणून ओळखले जात होते. साधारण ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी संपादनाच्या क्षेत्रात काम केले आहे. ‘कुंकू लावते माहेरचे’, ‘परीस’, ‘चॅम्पियन्स’, ‘लढाई’, ‘माय माऊली मनुदेवी’, ‘स्नेक अँड लॅडर’ हे काही त्यांनी संकलन केलेल्या चित्रपटांची नावे आहेत. वसंत कुबल यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचं मनोरंजन सृष्टीतील योगदान खूप मोठं आहे.
हेही वाचा : अलर्ट! आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा; पुढील ४८ तास राज्यावर पावसाचे संकट कायम





