Sachin Airplane Cricket : विमानात रंगला क्रिकेटचा थरार! सानियाच्या गोलंदाजीवर साराने घेतला सचिनचा कॅच, पाहा तेंडुलकर फॅमिलीचा VIDEO
Sachin Airplane Cricket : नुकताच सचिन तेंडुलकरचा एक अतिशय अनोखा आणि रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामध्ये तो चक्क हवेत उडणाऱ्या विमानात क्रिकेट खेळताना दिसत आहे

Sachin Tendulkar Plays Cricket In Airplane With Family : ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणारा भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचे या खेळावरील प्रेम आजही तसूभरही कमी झालेले नाही. वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून ४० व्या वर्षांपर्यंत जगावर राज्य करणाऱ्या मास्टर ब्लास्टरने व्यावसायिक क्रिकेट नक्कीच सोडले आहे, पण क्रिकेटने त्याला अजूनही सोडलेले नाही. नुकताच सचिन तेंडुलकरचा एक अतिशय अनोखा आणि रंजक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामध्ये तो चक्क हवेत उडणाऱ्या विमानात क्रिकेट खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याची लेक सारा तेंडुलकर आणि सून सानिया चंडोक या दोघींनी त्याला मैदानावर टक्कर दिली. (Sachin Airplane Cricket)
“मला कधीच आऊट करू शकणार नाही!” (Sachin Airplane Cricket )
सचिनने हा मजेशीर व्हिडओ शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, “अल्टिट्युड (उंची) काहीही असो, अॅटिट्युड बदलला नाही पाहिजे.” व्हिडिओमध्ये विमानाच्या आत सचिन फलंदाजी करत असून लेक सारा आणि सून सानिया गोलंदाजी करत आहेत. पहिल्या चेंडूवर साराने सचिनविरुद्ध आऊटची जोरदार अपील केली, तेव्हा सचिन हसून म्हणाला, “तू मला कधीच आऊट करू शकणार नाही. मी जर तिरक्या बॅटने खेळलो, तरच तुझ्याकडे थोडीफार संधी आहे.” मात्र, दुसऱ्याच चेंडूवर साराने अप्रतिम झेल (Catch) घेत वडिलांना आऊट केले आणि मोठा जल्लोष केला. ५३ वर्षांच्या सचिनचा हा कौटुंबिक अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला आहे. (Sachin Airplane Cricket)
Altitude jo bhi ho, attitude change nahi hona chahiye. 😄 pic.twitter.com/TPbsNUe2Op
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 12, 2026
मुलगा अर्जुन तेंडुलकरचा मैदानात धुमाकूळ! (Sachin Airplane Cricket )
एकीकडे सचिन तेंडुलकर कुटुंबासोबत आनंद साजरा करत असताना, दुसरीकडे त्याचा २५ वर्षांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मैदानात नाव कमावत आहे. मुंबई टी-२० लीगमध्ये खेळताना नुकतेच अर्जुनने अष्टपैलू कामगिरी करत शानदार अर्धशतक झळकावले आणि विकेट्सही घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
महत्त्वाचे म्हणजे, अर्जुन तेंडुलकरचा विवाह याच वर्षी ५ मार्च २०२६ रोजी त्याची बालपणीची मैत्रीण सानिया चंडोक हिच्यासोबत झाला आहे. सानिया ही एका मोठ्या औद्योगिक घराण्यातील असून ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. आयपीएल २०२६ मध्ये लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना अर्जुनला कमी संधी मिळाल्या असल्या, तरी आगामी हंगामात तो आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज आहे.





