sachin tendulkar : ‘एका भारतीयानं माझा विक्रम मोडला याचा मला मोठा आनंद..’; विराटच्या विश्वविक्रमानंतर सचिन झाला भावुक !

sachin tendulkar : विराट कोहलीने (virat kohli) वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक पूर्ण केले आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम त्याच्यासमोरच मोडीत काढला. हा सामना पाहण्यासाठी सचिन स्वतः वानखेडेवर उपस्थित आहे.
अखेर विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावे केलाय. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा (sachin tendulkar) विक्रम मोडून काढला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने 49 वे शतक झळकावून सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. सचिनने 452 एकदिवसीय डावात 49 शतके झळकावली होती. त्याचबरोबर कोहलीने 279व्या डावात 50 शतके झळकावली आहेत.
विराटच्या या शतकानंतर सचिन तेंडुलकरने (sachin tendulkar) ट्विट करत विराट कोहलीचे अभिनंदन केले. सचिन म्हणाला, “जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये भेटलो तेव्हा इतर खेळाडूंनी माझ्या पाया पडलास म्हणून तुझी मस्करी केली होती. त्या दिवशी मलाही हसू आवरता आलं नव्हतं.
The first time I met you in the Indian dressing room, you were pranked by other teammates into touching my feet. I couldn’t stop laughing that day. But soon, you touched my heart with your passion and skill. I am so happy that that young boy has grown into a ‘Virat’ player.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 15, 2023
पण लवकरच तू तुझ्या कामगिरीनं माझं मन जिंकलंस. तो तरुण मुलगा ‘विराट’ खेळाडू झाला आहे याचा मला खूप आनंद आहे. एका भारतीयानं माझा विक्रम मोडला यापेक्षा मोठा आनंद तो काय आणि तेही सर्वात मोठ्या स्टेजवर विश्वचषक उपांत्य फेरीत आणि माझ्या घरच्या मैदानावर”. असं सचिन म्हणाला आहे.
कोहली ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज…
विराट कोहलीने या विश्वचषकात 673 हून अधिक धावा केल्या आहेत आणि विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम (673) सचिनच्या नावावर होता.
कोहलीने आज हा विक्रम मोडला. यापूर्वी सचिन तेंडुलकरनं 2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत 673 धावा केल्या होत्या. गेल्या 20 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम विराटनं यंदा मोडलाय.





