Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरने होळीच्या दिवशी युवराजसोबत केला प्रँक, VIDEO होतोय व्हायरल

Sachin Tendulkar and teammates prank with Yuvraj Singh on Holi : भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने शुक्रवारी सोशल मीडियावर त्याच्या संघातील सहकाऱ्यांसोबत होळी खेळतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो युवराज सिंगची मस्करी करताना दिसत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू सध्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग (IML) क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसत आहेत, जिथे सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया मास्टर्सने अंतिम फेरी गाठली आहे.
सचिनने होळीच्या दिवशी युवराज सिंगवर एक प्रँक करण्याची योजना आखली आणि सहकाऱ्यांसग त्याच्या खोलीवर धडक मारली. यामध्ये सचिन तेंडुलकर एका मोठ्या पिचकारीसह दिसत आहे. त्याने व्हिडीओमध्ये सांगितले की, तो युवराज सिंगच्या खोलीत जात आहे आणि त्याच्यावर रंगांची उधळण करणार आहोत. जेव्हा युवराज सिंग उठला आणि त्याने त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला, तेव्हा सर्वांनी त्याच्यावर झडप घालत त्याला रंग लावला. यावेळी सचिनसोबत त्याचे इंटरनॅशनल मास्टर्स लीग (IML) चे सहकारी युसूफ पठाण आणि राहुल शर्मा देखील उपस्थित होते. ज्यांनी युवराजला त्याच्या हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले आणि नंतर त्याला रंग लावला.
इंडियन मास्टर्सच्या होळीच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल –
Holi fun with my @imlt20official teammates, from blue jerseys to colourful moments, this is how we say, “Happy Holi!” 💙 pic.twitter.com/uhYBZvptVT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 14, 2025
सचिन तेंडुलकर व्हिडीओमध्ये म्हणाला, “पिचकारी पूर्णपणे भरलेली आहे. मी युवराज सिंग सरांच्या खोलीत जात आहे, त्यांनी काल रात्री खूप षटकार मारले. आता आम्ही मारणार आहोत.” आयपीएल २०२५ च्या तयारीत सहभागी असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनीही होळी साजरी केली. पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी आपापल्या टीम हॉटेलमध्ये एकमेकांवर रंगांची उधळण केली.
हेही वाचा – Mitchell Starc : “भारत जगातील एकमेव देश, जो एकावेळी तीन संघ…”, मिचेल स्टार्ककडून भारतीय क्रिकेटचे कौतुक
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९४ धावांनी पराभव केला. युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. युवराज सिंगने ५९ धावांच्या खेळीत सात षटकार मारले. भारताने २० षटकांत २२० धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १८.१ षटकांत फक्त १२६ धावाच करू शकला. ज्यामुळे भारतीय संघाने अंतिम फेरीत मारली.





