Devoleena Bhattacharjee | ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत छोटी बहू हे पात्र साकारत अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य घराघरात पोहचली. या मालिकेने तिला रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या अभिनेत्री टीव्ही विश्वापासून दुर आहे. त्याचे कारण म्हणजे देवोलिनाने डिसेंबर महिन्यात गोंडस बाळाला जन्म दिला. प्रेग्नंसीमुळे देवोलिनाने कामातून ब्रेक घेतला होता. तिच्या लेकाचे नाव जॉय असून सध्या त्याचा सांभाळ करण्यासाठी ती आपला पूर्ण वेळ देत आहे. मात्र चाहते देखील तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देवोलिना सध्या टीव्ही विश्वापासून दुर असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये एका चाहत्याने देवोलिनाला “टेलिव्हिजनवर कमबॅक कधी करणार?” असा प्रश्न विचारला. यावर देवोलिनाने ‘सध्या तरी वेळ आहे, जॉय थोडा मोठा झाल्यानंतरच मी कमबॅक करेन’ असे सांगितले आहे. त्यामुळे गोपी बहूला पुन्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. देवोलीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘डान्स इंडिया डान्स’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘साथ निभाना साथिया’, ‘लाल इश्क’, ‘छटी मैया की बिटिया’ या मालिकांमध्येही काम केले आहे. याशिवाय ‘बिग बॉस 14’, ‘लेडीज वर्सेस जेंटलमैन’ या शोमध्येही ती दिसली. Devoleena Bhattacharjee | शाहनवाज शेखसोबत देवोलीनाचे लग्न देवोलीनाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिने २०२२ साली शाहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं. आंतरधर्मीय विवाह केल्याने देवोलिनाला ट्रोलही करण्यात आलं होतं. देवोलिनाचा पती शाहनवाज हा एक जीम ट्रेनर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी देवोलिना आणि शाहनवाज आई-बाबा झाले. Devoleena Bhattacharjee | हेही वाचा : “राज्य व देशातील विविध मुद्द्यांवर…”; संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट