SA vs PAK : रबाडाची तुफानी फलंदाजी! ११व्या क्रमांकावर ऐतिहासिक अर्धशतक मोडला ११९ वर्षांचा विक्रम

Kagiso Rabada breaks 119 year old record : दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कगिसो रबाडा आपल्या भेदक गोलंदाजीने फलंदाजांना त्रस्त करण्यासाठी ओळखला जातो. पण पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने फलंदाजीने सर्वांना चकित केले. ११व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या रबाडाने रावळपिंडीच्या मैदानावर ११६.३९ च्या स्ट्राइक रेटने धमाकेदार खेळी करत कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले आणि ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
रबाडाच्या खेळीच्या जोरावर द. आफ्रिकेने उभारला धावांचा डोंगर –
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची अवस्था २३५ धावांवर ८ बाद अशी होती. सेनुरन मुथुसामीच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीला रबाडाने ६१ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ७१ धावांची तुफानी खेळी करत साथ दिली. त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०४ धावा उभारल्या. रबाडाने ११व्या क्रमांकावर खेळताना दक्षिण आफ्रिकेकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नावावर केला. यापूर्वी हा विक्रम बर्ट वोग्लर याच्या नावावर होता, ज्याने १९०६ मध्ये इंग्लंडविरुद्ध केपटाउन कसोटीत ६२ धावा केल्या होत्या.
विश्वविक्रमाची संधी हुकली, तरी रचला इतिहास –
Kagiso Rabada now holds the fifth-highest score by a No.11 batter in a Test innings after a brilliant 71-run knock! 🇿🇦🔥🤝#PAKvSA #Tests #KagisoRabada #Sportskeeda pic.twitter.com/x26zsQbUDP
— Sportskeeda (@Sportskeeda) October 22, 2025
रबाडाच्या अर्धशतकानंतर त्याच्याकडून शतकाची अपेक्षा होती, ज्याने तो कसोटी क्रिकेटमधील ११व्या क्रमांकावर सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम नोंदवू शकला असता. मात्र, ७१ धावांवर त्याची खेळी संपली. तरीही, त्याने ११व्या क्रमांकावर खेळताना दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक कामगिरी केली.
हेही वाचा – ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा ऐतिहासिक विजय! तब्बल 12 वर्षांनंतर केला ‘हा’ खास पराक्रम
११व्या क्रमांकावर सर्वोच्च धावसंख्येची यादी –
कसोटी क्रिकेटमध्ये ११व्या क्रमांकावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या एश्टन एगरच्या नावावर आहे, ज्याने २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्ध नॉटिंघहॅम कसोटीत १०१ चेंडूत ९८ धावा केल्या होत्या. या यादीत टीनो बेस्ट (९५), जेम्स अँडरसन (८१) आणि झहीर खान (७५) यांच्यानंतर रबाडा आता पाचव्या स्थानावर आहे. रबाडाच्या या खेळीने त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही आपली छाप पाडली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांना घाम फोडणारी ही खेळी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात राहील.





