Saregamapa Music Show : ‘सा रे ग म प’ पुन्हा येणार! अवधूत गुप्तेंनी हटके स्टाइलने केली घोषणा
Saregamapa Music Show : महाराष्ट्रभरात लोकप्रिय असलेला हा 'सा रे ग म प' कार्यक्रम आता पुन्हा एकदा भेटीस येणार

Saregamapa Music Show : झी मराठीकडून अभिनेते आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता प्रेक्षकांना एकदा सुरांची मैफल अनुभवता येणार आहे. नुकतेच गायक संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी ‘सा रे ग म प’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
यासंदर्भात झी मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मिडीयावर एक प्रोमो शेअर केला आहे. यात अवधूत गुप्ते स्टुडीओमध्ये बसलेले दिसत आहे. तर एक मुलगी गाणं गाताना दिसते. तिचं गाणं ऐकून अवधूत गुप्ते ‘तोडलंस राणी तोडलंस, गाणं ऐकलं की कसं बरं वाटतं’ म्हणताना दिसतो.
जागतिक संगीत दिनानिमित्त, घेऊन येत आहोत तुमचा, आमचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम ‘सा रे ग म प’ लवकरच आपल्या झी मराठीवर… असे यात सांगण्यात आले आहे.
View this post on Instagram
आंतरराष्ट्रीय संगीत दिवसाचं निमित्त साधत नव्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. हा प्रोमो शेअर करत ‘महाराष्ट्राच्या घराघरात पुन्हा रंगणार सुरांची मैफल, कारण गाणं ऐकलं की बरं वाटतं..’ असं कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सध्या कार्यक्रमाचा फक्त प्रोमो समोर आला आहे. कार्यक्रमाची वेळ आणि तारिख जाहीर झालेली नाही.
दरम्यान, आर्या आंबेकर, रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड यांसारख्या गायकांना या कार्यक्रमातून मोठीओळख मिळाली. या कार्यक्रमानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली. महाराष्ट्रभरात लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम आता पुन्हा एकदा भेटीस येणार असल्याने चाहत्यांचीही उत्सुकता अधिक वाढली आहे.
हेही वाचा:




