एस. पी. महाविद्यालयात सर्व ‘डेज’वर बंदी
Updated On:

पुणे – सध्या वरिष्ठ महाविद्यालयात “व्हॅलेंटाइन डे’, “चॉकलेट डे’, “साडी डे’, “रोज डे’ आणि महोत्सवाचे वारे वाहात असतानाच आता स. प. महाविद्यालयाने (एस.पी.कॉलेज) या सर्व डेज साजरे न करण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. महाविद्यालय प्रशासनने या सर्व डेजवर बंदी घातली आहे.
यासंदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ म्हणाले की, महाविद्यालयात विभागांअतर्गत विविध महोत्सवांचे आयोजन होत आहे. त्यात विद्यार्थी निश्चितपणे सहभागी होऊ शकतात. महाविद्यालयाबाहेरील घटकांकडून महाविद्यालयाच्या आवारात “डे’ साजरे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे महाविद्यालयील शैक्षणिक वातावरण बिघडू शकते.
महाविद्यालयातील वातावरण आणि सुरक्षितता कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. असे कोणतेही दिवस साजरे करायचे असल्यास पूर्वपरवानगी आवश्यक आहे.





