एस. बालन टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा | एमईएस इलेव्हनला विजेतेपद

पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित तिसऱ्या एस. बालन टी-20 लीग अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत एमईएस इलेव्हन संघाने गेम चेंजर्स इलेव्हन संघाचा 4 गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
अंतिम सामन्यात एमईएस इलेव्हन संघाने गेमचेंजर्स इलेव्हन संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवले. गेमचेंजर्स इलेव्हन संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 126 धावा धावफलकावर लावल्या. एमईएस इलेव्हन संघाने हे आव्हान 19 षटकात व 6 गडी गमावून पूर्ण केले. शुभम हरपाळे सामन्याचा मानकरी ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या ग्रुपच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सौरभ गोखले आणि अनुजा साठे-गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.
विजेत्या एमईएस इलेव्हन संघाला 1 लाख 11 हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या गेमचेंजर्स इलेव्हन संघाला 51 हजार रूपये व करंडक देण्यात आला. या शिवाय वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली. मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू नौशाद शेख याला 21 हजार रूपये आणि करंडक देण्यात आला. सर्वोत्कृष्ट फलंदाज हर्ष संघवी, सर्वोत्कृष्ट गोलंदाज नौशाद शेख यांना प्रत्येकी 11 हजार रूपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक (अंतिम सामना) :
गेमचेंजर्स इलेव्हन : 18.2 षटकात सर्वबाद 126 धावा. (शुभम रांजणे 43, अझीम काझी 39, शुभम हरपाळे 3-24, आयुश काब्रा 2-15, दिपक डांगी 2-23) पराभूत वि. एमईएस इलेव्हन : 19 षटकात 6 बाद 129 धावा. (हर्ष संघवी 39, रोहीत हाडके 22, सुजित उबाळे 13,अझीम काझी 2-13). सामनावीर ः शुभम हरपाळे.





