कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धा | ग्लोबल वॉरीयर्सला विजेतेपद

पुणे – एजीए मॅनेजमेंट आयोजित पहिल्या एमरल्ड करंडक अजिंक्यपद कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाने 213 धावांचे आव्हान पार करत रायझिंग स्टार्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
अंतिम सामन्यात 425 धावांचा पाऊस पडला. रायझिंग स्टार्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकामध्ये 9 गडी गमावून 212 धावांचे आव्हान उभे केले. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघाने हे आव्हान 18.1 षटकात व 5 गडी गमावून पूर्ण केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एजीए मॅनेजमेंट आदित्य पाळंदे, गिरीष ओक, अमित उमरीकर आणि शंतनू आठवले उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्या ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब आणि उपविजेत्या रायझिंग स्टार्स संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली.
संक्षिप्त धावफलक –
अंतिम फेरी : रायझिंग स्टार्स : 20 षटकात 9 बाद 212 धावा. (कौस्तुभ भाकरे 55, अभिषेक कौशिक 41, केतन पासलकर 43, शशांक जोशी 3-42, सुजित उबाळे 2-27). पराभूत वि. ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब : 18.1 षटकात 5 बाद 213 धावा. (जय मेहता 86, अभिषेक खांबेटे 24, मनिष सेजवळ नाबाद 23, सुजित उबाळे 22, केतन पासळकर 2-37). सामनावीर : जय मेहता.





