Russia : भारत किंवा अन्य देशांना रशियाचे (Russia) तेल खरेदी करण्यापासून अमेरिकेने रोखल्याचा आरोप रशियाने (Russia) केला आहे. जागतिक पातळीवर आर्थिक एकाधिकारशाहीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अमेरिका आयात शुल्क, निर्बंध आणि थेट बंदीसारख्या दडपशाहीचे धोरण राबवत आहे. अमेरिका रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध घालून अमेरिका स्पर्धकांना दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. भारत आणि ब्रिक्समधील अन्य महत्वाच्या धोरणात्मक भागीदारांबरोबर व्यापार, गुंतवणूक सहकार्य आणि लष्करी तांत्रिक संबंध नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही लावरोव्ह यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. पूर्वीची मक्तेदारी सोडून देण्यास पाश्चात्य तयार नाहीत. ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून स्पर्धकांना दडपून टाकण्यासाठीचा संघर्ष उघडपणे सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले. अमेरिकेने मांडलेला युक्रेनबाबतचा प्रस्ताव रशियाने अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या चर्चेमध्ये स्वीकारला असून आता हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. मात्र उलट रशियाविरोधात रशियाच्या जहाजांवर निर्हबंध घातले जात आहेत. युरोपने रशियाचे तेल खरेदी करणे फार पुर्वीच थांबवले आहे. आता भारत आणि इतर देशांनाही थांबवले जात आहे, असेही ते म्हणाले.