Russia-Ukraine War : युक्रेनकडून रशियावर तब्बल एक हजार ड्रोनचा मारा; रहिवासी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान
युक्रेनच्या सैन्याने आज रात्रभरात रशियावर तब्बल एक हजार ड्रोनचा (Russia-Ukraine War) मारा केला.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या सैन्याने आज रात्रभरात रशियावर तब्बल एक हजार ड्रोनचा (Russia-Ukraine War) मारा केला. यातील शेकडो ड्रोन रशियाची राजधानी मॉस्कोला लक्ष्य करण्यासाठी डागण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रशियामध्ये स्थानिक निवडणुकीसाठीचे तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचे मतदान संपत असतानाच हा मोठा हल्ला युक्रेनच्यावतीने करण्यात आला.
मॉस्कोवर युक्रेनकडून (Russia-Ukraine War) करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता, असे मॉस्कोच्या महापौरांनी म्हटले आहे. या हल्ल्यात रशियातल्या सर्वात मोठ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पाचे आणि रहिवासी इमारतींचेही नुकसान झाले.
संपूर्ण मॉस्कोच्या क्षेत्रामध्ये झालेल्या या हल्ल्यात किमान दोघे जण ठार झालेआणि २० जण जखमी झाले, असे स्थानिक गव्हर्नर आंद्रेई वोरोबियोव यांनी सांगितले. मृतांमध् ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि ४४ वर्षीय महिलेचा समावेश होता, असे ते म्हणाले.
युक्रेनने रशियावर क्षेपणास्त्रे आणि देशांतर्गत उत्पादन केलेल्या फ्लेमिंगो आणि पेलिकान ड्रोनचा मारा केला. रशियाच्या तेल आणि पायाभूत सुविधांना या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. हे देशांतर्त उत्पादन केलेले ड्रोन म्हणजे अब्जावधी डॉलर असून त्याने युद्ध यंत्रणेला जिवंत ठेवले आहे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनने संपूर्ण मॉस्को प्रदेशात, ताबा घेतलेल्या युक्रेनच्या प्रदेशात आणि काळ्या समुद्रात डागलेली १,१०० ड्रोन पाडल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. मॉस्कोवर डागली गेलेली ४५० ड्रोन पाडण्यात आली आणि या हल्ल्यात मॉस्को तेल शुद्धिकरण प्रकल्पाचे नुकसान झाल्याचे मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबियानिन यांनी म्हटले आहे.
मॉस्कोवरचा हा अनपेक्षित हल्ला निवडणुकीमध्ये अडथळे आणण्यासाठी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुतीन यांना वाटाघाटी कराव्या लागाव्यात यासाठी रशियातल्या सामान्य नागरिकांना या युद्धाच्या झळा बसाव्यात असा प्रयत्न युक्रेन करत आहे.
संसदीय निवडणुकीसाठी मतदान…
युद्ध सुरू असताना रशियामध्ये पहिल्यांदाच संसदीय निवडणुकांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत अध्यक्ष वव्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात फारसे कोणी विरोधक नसल्यामुळे या निवडणुकीत पुतीन यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. या विजयामुळे क्रेमलिनवरील पुतीन यांची पकड अधिकच घट्ट होणार आहे.
रशियाने युद्धादरम्यान बेकायदेशीरपणे ताबा घेतलेल्या युक्रेनच्या चार प्रदेशांमध्येही हे मतदान होते आहे. जरी रशियाने या प्रदेशांचा ताबा घेतला असला, तरी या प्रदेशांवर रशियाचे पुर्ण नियंत्रण नाही. याशिवाय रशियाने २०१४ मध्ये बेकायदेशीरपणे आपल्या भूभागाला जोडून घेतलेल्या क्रिमियामध्येही मतदान होते आहे. / प्रदेशातील संसदीय निवडणूक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
युक्रेनने ड्रोन तंत्रज्ञान केले प्रगत
रशियाने युक्रेनवर चार वर्षांपुर्वी केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेनने (Russia-Ukraine War) आपल्या ड्रोन तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली आहे. जागतिक पातळीवर युक्रेनची ड्रोन सध्या लक्षणीय मानली जात आहेत. देशांतर्गत उत्पादन केलेल्या लांब पल्ल्याचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे रशियाच्या हद्दीमध्ये खोल आतपर्यंत जाऊन मारा करणे युक्रेनला शक्य होते आहे.
या ड्रोनच्या प्रभावी वापरामुळे जगभरातील अनेक देशांची सरकारे आणि संरक्षण उत्पादकांसाठी हे तंत्रज्ञान आकर्षण बनले आहे. यापुर्वी देखील युक्रेनने रशियाच्या हवाई तळांवर लांब पल्ल्याच्या ड्रोनचा मारा करून तब्बल ४० लढाऊ विमाने नष्ट केली होती.






