Russia Ukraine War : युक्रेनने 800 रशियन सैनिक मारल्याचा केला दावा

रशिया-युक्रेन युद्धाचा आज दुसरा दिवस आहे. या युद्धाच्या दुसऱ्या दिवसी मोठी जिवीत हानी झाल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केल्याचा आज दावा केला आहे. शिवाय 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली असल्याचा युक्रेनने आपल्या दाव्यात म्हंटले आहे.
युक्रेनच्या उपसंरक्षण मंत्री हन्ना मलयार यांनी 25 फेब्रुवारीच्या पहाटे 3 वाजेपर्यंत शत्रूचे किती नुकसान झाले हे सांगितले. मलयार यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने आतापर्यंत 7 विमान युनिट्स, 6 हेलिकॉप्टर युनिट्स, 30 हून अधिक टँक युनिट्स आणि रशियाच्या 130 बीबीएम युनिट्स नष्ट केल्या आहेत. याशिवाय 800 रशियन सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्या आहेत. शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की ते कीवमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. या रशियनांचे पहिले टार्गेट एकच असून दुसरे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.




