Russia Ukraine War : युक्रेनच्या राजधानीवर रशियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा; 9 जण ठार
युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Russia Ukraine War) आणि ड्रोनचा मारा केला. या हल्ल्यामध्ये किमान 9 जण ठार झाले आणि 22 जण जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War : युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियाने शुक्रवारी मध्यरात्रीनंतर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Russia Ukraine War) आणि ड्रोनचा मारा केला. या हल्ल्यामध्ये किमान 9 जण ठार झाले आणि 22 जण जखमी झाले आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे अवशेष पडल्यामुळे कीव्ह शहरातील सोलोमियांस्की भागातील एका पाच मजली निवासी इमारतीचे नुकसान झाले.
बचाव पथकाने इमारतीच्या वरच्या मजल्यांवरून ३५ जणांना बाहेर काढले, त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून, दोन मुलांसह आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. कीव्हच्या डार्नित्स्की जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यात घरे, वाहने, प्रशासकीय आणि अनिवासी इमारतींना आग लागून नुकसान झाले. यात सात जण ठार आणि १४ जण जखमी झाले.
दुसरीकडे, राजधानीच्या शेवचेन्किव्हस्की जिल्ह्यात आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी एका गैर-निवासी इमारतीला लागलेली आग विझवली. शहराच्या इतर दोन जिल्ह्यांमध्ये व्यावसायिक आणि निवासी इमारतींचे नुकसान झाले.
दोनच दिवसांपुर्वी रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा मारा केला होता. त्यामध्ये १० लोक ठार झाले होते आणि ५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. रशियाची ही क्षेपणास्त्रे पोलंडच्या हवाई हद्दीतून आली होती.
ट्रम्प यांचे आश्वासन फसवे..
रशियाच्या हवाई हल्ल्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणेची युक्रेनला गरज आहे. ही यंत्रणा मिळावी अशी अपेक्षा अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि पाश्चात्य भागीदारांकडे पुन्हा एकदा केली आहे.
युक्रेनला (Russia Ukraine War) पॅट्रिएट हवाई संरक्षण प्रणाली बनवण्याचा परवाना अमेरिकेकडून दिला जाईल, असे अध्यक्ष ट्रम्प अंकारा येथे झालेल्या नाटोच्या परिषदेदरम्यान म्हणाले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्यावेळी त्यांनी आपले आश्वासन फिरवले. या संदर्भातला अंतिम निर्णय आपण घेतला नसल्याचे ते म्हणाले.






