Russia-Ukraine war: रशियन हवाई हल्ल्यात 21 ठार, 25 जखमी

किव (युक्रेन) – रशिया आणि युक्रेनमध्ये काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत युद्ध थांबवण्यासाठी अनेक बैठक झाल्या. मात्र हे युद्ध थांबवण्याच नाव घेत नाही. युक्रेन शरण येण्यास तयार नसल्याने रशियाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
रशियाने युक्रेनच्या अनेक शहरावर हल्ले सुरू ठेवले केले. अशात रशियन सैन्याने युक्रेनच्या खारकीवजवळही हवाई हल्ला केला. या हवाई हल्ल्यात जवळपास 21 युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 25 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. खारकीवजवळील शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर हल्ला करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनच्या मारियुपोल शहरातील थिएटरवर हवाई हल्ला केला. यावेळी या थिएटरमध्ये 1000 लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात 21 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.





